बायोमेडिकल अभियांत्रिकी मध्ये करिअर करण्यासाठी सोलापूर व परिसरातील विद्यार्थ्यांना पूर्वी मुंबईला जावे लागत होते. सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरातच करिअरची संधी देण्यासाठी केगाव येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायो मेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे .भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी असल्याने अभियांत्रिकेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी बायोमेडिकल मध्ये करिअर निवडावे. असे आव्हान महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र डी. गायकवाड यांनी केले आहे. श्री. गायकवाड म्हणाले की, अत्याधुनिक आरोग्य सेवेतील उपाय विकसित करण्यासाठी ही पदवी महत्त्वाची आहे. वैद्यकीय उपकरणे, निदान उपकरणे विकसित केली जातात. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या प्रत्येक पैलूला या माध्यमातून स्पर्श होतो. या क्षेत्रातील अभियंते एम. आर .आय मशीन, सिटी स्कॅनर आणि पोर्टेबल डायग्रासिस्टिक टूल्स यासारख्या उपकरणाची रचना आणि सुधारणा करत आहेत. याशिवाय हृदय आणि हृदय गती आणि रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीचे निरीक्षण करणाऱ्या स्मार्ट घड्याळ सारखे तंत्रज्ञान बायो मेडिकल अभियांत्रिकीच्या माध्यमातून शिकता येणार आहे. जटिल वैद्यकीय डेटाचे विश्लेषण करण्यासाठी रोग निदानात मदत करण्यासाठी आणि रुग्णाच्या परिणामाच्या अंदाज घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातून उपकरणे विकसित केली जात आहे. बायोमेडिकल अभियांत्रिकीसह ए आय हे औषधाच्या निर्मितीकडे नेत आहे. लोकसंख्या वाढत असल्याने प्रगत आरोग्य सेवा उपचाराची मागणी वाढत आहे. बायोमेडिकल अभियंत्याची ही गरज वाढणार आहे. विद्यापीठे आणि संशोधन संस्था त्याच्या जैव वैद्यकीय अभियांत्रिकी कार्यक्रमाचा विस्तार करत आहेत. भविष्यातील करिअरची संधी ओळखून भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाने हा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासक्रमासाठी 63 जागा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या शाखेत प्रवेश घेऊन नव्या क्षेत्रात करिअर घडवावे असे आव्हाने ही संस्था अध्यक्ष रवींद्र डी .गायकवाड यांनी केली आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य बोलताना म्हणाले की सर्व अभियांत्रिकी साठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. प्रत्येक लॅब मध्ये इंडस्ट्री ग्रेड उपकरणे,अपडेटेड सॉफ्टवेअर,आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. स्मार्ट क्लासरूम मधील डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर ई लर्निंग सॉफ्टवेअर व तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या इंडस्ट्रीमध्ये सहज प्रवेश होतो. तांत्रिक शिक्षणासोबत सादरीकरण कोलेब्रेशन व इनोव्हेशन सारखी कौशल्य विकसित होतात. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल के देशमाने यांनी सांगितले.
चौकट
बायोमेडिकल इंजिनिअरिंग -परदेशात उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी आहे
परदेशात विशेषता: अमेरिका, इंग्लंड ,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ,जर्मनी ,कॅनडा या देशात मोठ मोठ्या कंपनीत बायोमेडिकल इंजिनिअरिंग तसेच मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल संशोधन केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात संधी आहे.
Post Views: 23