Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कडाक्याची थंडी, दुरवर पसरलेली धुक्याची चादर अन् हिमकणांचा सडा, महाबळेश्वर गारठले….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 20, 2024
in maharashtra
0
कडाक्याची थंडी, दुरवर पसरलेली धुक्याची चादर अन् हिमकणांचा सडा, महाबळेश्वर गारठले….
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा: महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी पडली असून सकाळी दहा अंश डिग्री सेल्सिअस तापमान वेण्णालेक परिसरात होते. या परिसरातील तापमानाचा पारा जरी उतरला असला, तरी या गुलाबी थंडीचा अनुभव पर्यटक घेत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणातील पारा कमी जास्त होत असून हेच वातावरण काही दिवस राहिले, तर वेण्णालेक -लिंगमळा परिसरात हिमकणांचा सडा पाहण्यास मिळेल.

खरं तर मकर संक्रात सणानंतर थंडीचा कडाका कमी होत असतो, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. शहराचे तापमान १२ अंश, तर वेण्णालेक, लिंगमळा परिसरात तापमान दहा अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे महाबळेश्वर शहर थंडीने पुरते गारठले आहे.

मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये गेले तीन-चार दिवसांपासून गुलाबी थंडीचे वातावरण असून, हवेत चांगलाच गारवा आहे. थंड झुळूक घेऊन येणाऱ्या वाऱ्याने स्थानिकांसह पर्यटक काश्मीरचा फील अनुभवत आहेत. शहरात उबदार कपडे परिधान करून स्थानिकांसह पर्यटक पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी तर नागरिक रस्ते, दुकान, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण मिळवत होते. शनिवार, रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची संख्या सकाळपासून वाढू लागली आहे.

जिल्ह्यात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, डिसेंबरच्या मध्यानंतर काही दिवस पारा १३ अंशापर्यंत खाली आला होता. मागील पाच दिवसांपासून किमान तापमानात सतत कमी होत गेले आहे. जिल्ह्याचा पारा घसरल्यामुळे बाजारपेठ, शेतीच्या कामावरही परिणाम झाला असला तरी रब्बी हंगामातील स्ट्रॉबेरी, गहू, हरभरा पिकांना ही थंडी पोषक ठरणार आहे.

सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातही शेकोट्या पेटविण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. सातारा शहराचा पाराही घसरला आहे. काही दिवसांपूर्वीच १८ अंशापर्यंत असणारे किमान तापमान तीन -चार दिवसांपासून घसरले आहे. त्यातच शनिवारी १२ अंश डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळ असलेले कास ठोसेघर, कोयनानगर या परिसरातील तापमान घटले असून ते १३ अंश डिग्री सेल्सिअस आहे. सध्या तरी हे तापमान या वर्षातील नीच्चांकी ठरले आहे, तर या कडाक्याच्या थंडीने सकाळच्या सुमारास फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही रोडावल्याचे चित्र दिसत आहे.

Post Views: 65
Previous Post

दावोस दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं? उद्योग मंत्री उदय सामंत LIVE

Next Post

विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 23 जानेवारीला होणार प्रसिध्द

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 23 जानेवारीला होणार प्रसिध्द

विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 23 जानेवारीला होणार प्रसिध्द

ताज्या बातम्या

गौरी पूजनासह महानैवेद्याचा थाट; घराघरांत भक्तिमय वातावरण #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 18, 2026

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

पालकमंत्री घेणार सोमवारी पाणीटंचाईचा आढावा #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

संभाजी ब्रिगेडचा जिल्हा परिषदेत राडा…. #viral #solapurnews #news

September 18, 2026

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील शिक्के गेले चोरीला नगरसेविका श्रद्धा पवारांनी वेधले लक्ष

September 18, 2026

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1230838

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!