पिलीव – सालाबादप्रमाणे याही वर्षी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ग्रामस्थांच्या वतीने ,गावात रोगराई येऊ नये भरपूर पाऊस पडावा सर्वसामान्य माणूस सुखी राहावा संकट मुक्त राहावा म्हणून म्हणून श्री मरीमाता देवीस ग्रामस्थांच्या वतीने आजाबळी देऊन महानैवेद्याचे वाटप ही करण्यात आले.
श्री मरी माता देवीच्या भक्तांनी व,सुवासिनी पोतराजाच्या सहभागाने गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून गावातील सर्व देव देवतांस,आरत्या करून सुख समृद्धी रोगराई मुक्तीसाठी सर्व देवतास साकडे घालून संपूर्ण गावातून मिरवणूक काढून गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर जागृत देवस्थान असलेल्या बाजार तळावरील श्री मरी माता देवीस भावीक भक्तांच्या ग्रामस्थांच्या वतीने आजान बळी देऊन विधिवत पूजा आठखूरी मेंढीचा अजाबळी देऊन आरत्या करून गावजत्रेस प्रारंभ करण्यात आला
यावेळी दिवसभर परिसरातील गावातील गजी ढोल संघाने आकर्षक असा गजी ढोलाचा खेळ सादर केला त्याचप्रमाणे दिवसभर देवीची गाणी, सुवासिनीना भोजन, तसेच गावातील ग्रामस्थांनी भाविक भक्तांनी देवीस नैवेद्य नारळ कोंबडे बकरी याचा आजाबळी देऊन भक्तिमय वातावरणात गाव जत्रा साजरी करण्यात आली
यावेळी श्री मरीमाता देवस्थान समितीच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . त्याप्रमाणे उपस्थित बालक महिला व ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सदरची मरीमातेची गाव जत्रा यशस्वीपणे पार पाडणे कामी समितीचे शंकर उर्फ गुदा काळे, किशोर लोखंडे ,सुनील काळे, महेश वाघमारे, हरिभाऊ लोखंडे ,दशरथ काळे, प्रवीण भांडेकर, हरिभाऊ खुर्द पाटील, सुशील जगन्नाथ करडे, विजय कुंभार ,लखन जरग,लखन काळे राजू काळे यांनी परिश्रम घेतले .
Post Views: 19