वळसंग – वळसंग.(ता.द.सोलापूर) यशकल्याणी सेवाभावी संस्था पुणे, शिक्षण समिती जिल्हा परिषद सोलापूर व दक्षिण सोलापूर इंग्रजी विषय शिक्षक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय हत्तुरेनगर सोलापूर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेतील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहेत.या स्पर्धेत इयत्ता पाचवी व सहावीचा पहिला गट, इयत्ता सातवी व आठवीचा दुसरा गट तर इयत्ता नववी व दहावीचा तिसरा गट याप्रमाणे या तिन्ही गटांतून प्रशालेतील एकूण नऊ विद्यार्थी या तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.त्यांपैकी इयत्ता सातवी व आठवी या गटातून कुमारी वैष्णवी भोजराज तोळणुरे हिने द्वितीय क्रमांक तर कुमारी वैभवी विश्वास जाधव हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहेत.
या यशस्वी विद्यार्थिनींना उपस्थित मानवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे शिक्षक मुख्याध्यापक वीरेश थळंगे, सहशिक्षक श्रीमंत भोसले, मल्लिनाथ गौडगाव , शिवराज अष्टगी यांच्यासह पालकांचे मार्गदर्शन लाभले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष श्रीशैल दुधगी, चेअरमन शिवशरण थळंगे , उपाध्यक्ष विश्वनाथ थळंगे, सदस्य शिवशरण प्याटी, प्रकाश दुधगी, मल्लिनाथ थळंगे, रमेश दुधगी,पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्यासह इतर सर्व सदस्य व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.