धाराशिव : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त वुमन्स डॉक्टर विंग धाराशिव, इंडियन मेडिकल असोसिएशन धाराशिव आणि रोटरी क्लब धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०२६-२८ या कालावधीसाठी वुमन्स डॉक्टर विंगच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळाही उत्साहात पार पडला.
भारतरत्न डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने बुधवार 1 जुलै रोजी आयोजित कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कानडे, डॉ. सचिन देशमुख प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. अनुराधा गरड यांनी अध्यक्षा, डॉ. शिल्पा देशमुख व डॉ. स्मिता गवळी यांनी उपाध्यक्ष, डॉ. श्रद्धा मुळे यांनी सचिव, डॉ. प्रिया बाराते यांनी सहसचिव, डॉ. मंजुषा चव्हाण यांनी खजिनदार, डॉ. स्मिता शहापूरकर यांनी राज्य प्रतिनिधी, तर डॉ. ललिता स्वामी, डॉ. नीता पोळ, डॉ. अश्विनी बलवंडे आणि डॉ. शुभांगी गायकवाड यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून पदभार स्वीकारला.
कार्यक्रमास माजी अध्यक्षा डॉ. कौशल्य राजगुरू, डॉ. स्वाती पांढरे, डॉ. सुरेश चौरे, डॉ. मुंडेवारी, डॉ. विवेक कोळगे आणि डॉ. दिनेश कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पोतदार यांनी केले. डॉ. महेश कानडे आणि डॉ. सचिन देशमुख यांचे कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिरात डॉ. वैशाली डंबळ, डॉ. शिल्पा हंबीरे, डॉ. आरती डंबळ, डॉ. रेखा टिके, डॉ. ज्योती सोनटक्के, डॉ. अस्मिता साबळे आणि डॉ. ज्योती कानडे यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 9