कासेगांव – कासेगाव येथे श्रीगणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उघ्दाटन गणपतीच्या मूतीचे पूजन करून करण्यात आले.या शिबिरात ४२ रक्तदात्यांनी केले. श्रीकृष्ण गणेश उत्सव तरूण मंडळ गवळी गल्ली कासेगांव यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान
शिबिरात सहभागी झालेल्यांना स्कूल बॅग भेट म्हणून देण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्ष संतोष जानगवळी,उपाध्यक्ष मयुर शिंदे,शंकर साठे,रेवणसिद्ध साखरे,विजय शिंदे,बाबूशा धोत्रे,दाजी देशमुख,अक्षय साठे,संतोष जगताप,लखन दहिहांडे,अक्षय हैसेकर,प्रतिक खराडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 6