ओम गणेश तरुण मंडळ, म्हेत्रे वस्ती, मंद्रूप यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, सुदर्शन हसापुरे, चंद्रकांत ख्याडे, तमण्णा पुजारी, नागनाथ म्हेत्रे, चंद्रकांत देशमुख, जगन्नाथ म्हेत्रे, अमीर शेख, प्रदीप ख्याडे, जावेद शेख, नागनाथ नंदुरे, मंडळाचे अध्यक्ष बनसिद्ध म्हेत्रे, गंगाराम नरूटे, राहुल भागवत आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अनंत म्हेत्रे, संजय म्हेत्रे, ज्ञानदीप म्हेत्रे, महेश म्हेत्रे, सिद्धलिंग म्हेत्रे, महादेव इमडे, धरी म्हेत्रे, रवी म्हेत्रे, औदुसिद्ध नरूटे, सचिन म्हेत्रे, विनायक म्हेत्रे, केदार म्हेत्रे, समर्थ जोडमोटे, विवेक म्हेत्रे, अजय म्हेत्रे, अंकुश म्हेत्रे, स्वप्नील म्हेत्रे आदींनी नियोजन व परिश्रम घेतले.
रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान केल्याबद्दल मंडळाच्या वतीने रक्तदात्यांचे आभार मानण्यात आले.