बार्शी – अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज सोमवारी बार्शी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बार्शी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुष्काळाच्या गंभीर परिस्थिती मोर्चाच्या घोषणांमधून दिसून आली. हा मोर्चा कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांचे नेतृत्वाखाली काढण्यात आला.
मोर्चामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या; संपूर्ण बार्शी तालुका दुष्काळ जाहीर करा आणि तातडीने प्रती हेक्टरी ५०,०००/- रु. भरपाई द्या , २०२५ चा पीकविमा द्या, पिण्याच्या पाण्याची सोय करा, जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदान द्या, मागेल त्याच्या हाताला रोजगार हमी योजनेचे काम द्या, भ्रष्टाचारविरहित रेशनिंग व्यवस्था मजबूत करा, सरसकट कर्जमाफी करा, नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून ५० हजार रुपये अनुदान द्या, विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची फी माफ करा, विनाअडथळा दिवसा वीज पुरवठा करा, खरीप हंगामाची गेलेली पिकाची नुकसान भरपाई द्या, येऊ घातलेल्या रब्बीसाठी मदत द्या, अल्पदरात बी-बियाणे, खते उपलब्ध करा, वाढती महागाई कमी करा, एमएसपी दराने शेतीमाल खरेदी करा, आत्महत्या शेतकरी व शेतकरी कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत करा.
मोर्चा तहसीलवर जातात येथे सभेमध्ये रुपांतर झाले. यावेळी कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे तर तो आदर्श सरकार विसरले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. पिकाची राख रांगोळी होत आहे. परंतु सरकार दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. शेतकरी सरकारची गुर्मी उतरवून दुष्काळ पदरात पाडून घेतील.
यावेळी लहू आगलावे, ए.बी. कुलकर्णी, राहुल भड, विलास बारबोले, मनोज मोरे, घोडके मामा, प्रविण मस्तुद , हरी पवार , प्रा. सतीश पाटील, मनोज डुरे पाटील, निर्मला सरवदे, पांडुरंग यादव, मुबारक मुलानी, दत्ता कदम, भारत भोसले, भरत चव्हाण, किसन मुळे, आनंद गुरव, प्रमोद मंडलीक, दत्तात्रय नेहरकर, रशिद इनामदार, कैलास माने आदी उपस्थित होते.
Post Views: 12