भोकर(प्रतिनिधी)जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता राजानंद माणिकराव चव्हाण हे २५ वर्ष प्रदिर्घ सेवा करुन सेवानिवृत्त होत आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या वतीने दि.२८ रोजी राजानंद चव्हाण यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी कार्यकारी अभियंता एस.के. शिंदे,मूंडे हदगावचे उपअभियंता विजय कांबळे एस.एन.पाटील सौंधनकर चाटोरीकर कंत्राटदार गोविंदराव उल्लेवाड व्यंकट वर्षेवार कार्यालयीन कर्मचारी धम्मा कावळे शैलेश गायकवाड सह कार्यालयाचे गँगमन आदिची प्रमूख उपस्थिती होती.कंत्राटदार व कार्यालयीन कर्मचार्यांकडून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला साडी चोळी टोपी पूष्पहाराने भव्य सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना राजानंद चव्हाण म्हणाले कि भोकर शहरात सेवा करित असताना मला येथील अधिकारी व कार्यालयीन कर्मचार्यांनी भरपूर प्रेम दिले हे कधी विसरु शकत नाही असे म्हणाले.कंत्राटदार उल्लेवाड यांनी बोलताना म्हणाले की,शाखा अभियंता चव्हाण यांनी कामाची पहाणी करताना गूत्तेदारांना कामाचा दर्जा सूधारण्यासाठी सांगायचे असे ते म्हणाले संचलन सूवर्णकार यांनी केले तर आभार कृष्णा पाटील यांनी मानले यावेळी जि.प.बांधकाम उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी सरपंच कंत्राटदार पत्रकार उपस्थित होते.