नवीन नांदेड प्रतिनिधी
शिवाजी विद्यालय सिडको येथील लिपिक सुभाष गोविंदराव भवर हे धानोरा ता. हदगाव येथील रहिवासी असून दिनांक ३० जून २०२४ रोजी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.
शिवाजी विद्यालय सिडको येथील लिपिक सुभाष भवर हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून प्रथमच त्यांनी दिनांक २१ नोव्हेंबर १९९१ रोजी जनता अध्यापक विद्यालय नांदेड येथे शासकीय नोकरीसाठी नेमणूक झाली. त्यानंतर त्यांची नेमणूक २८ डिसेंबर १९९४ पासून शिवाजी विद्यालय सिडको येथे लिपिक म्हणून कार्यरत होते. सुभाष गोविंदराव भवर हे आपले शासकीय सेवेतील ते ३० वर्षाच्या प्रदीर्घ शिवेनंतर दिनांक ३० जन रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर व मित्रमंडळीने पुढील सेवानिवृत्त काळासाठी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या आहेत.