सोलापूर – अनुरूप वधु वर सुचक केंद्र ,सोलापूर च्या वतीने रविवार दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शैक्षणिक संस्था सभागृह ,दत्त चौक, सोलापूर येथे सर्व शाखीय ब्राह्मण वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनुरूप वधु वर सुचक केंद्राचा हा 53 वा वधू – वर मेळावा असून मेळाव्यात प्रथम, घटस्फोटीत, विधवा, विदुर ,पुनर्विवाह इच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी घेण्यात येत आहे. नोंदणी धारकास घरपोच वधू- वर पुस्तिका देण्यात येणार आहे. मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण, कर्नाटक येथील उपवर वधू-वरांची नोंदणी झालेली असून इच्छुक वधू वर पालकांनी भ्रमणध्वनी क्र.9881133122 वरती संपर्क साधावा. या कार्यक्रमात प्रेरणाताई रानडे उपवर वधू-वर व पालकांना विवाह संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. ब्राह्मण समाजातील उपवर वधु वर व पालकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राघवेंद्र आद्य गुरुजी यांनी केले आहे.
Post Views: 3