सोलापूर : एका अल्पवयीन मुलीला दुचाकी वरून घेऊन जाऊन तिचा विनयभंग करून स्वतःचे व मुलीच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
आरोपी मयूर अंबादास पुजारी (रा. आशा नगर, सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी मयूर याने फिर्यादीची मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिला २४ मे २०२६ रोजी संध्याकाळी भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने तिला दुचाकीवरून विटभट्टीजवळील एका निर्जन ठिकाणी असलेल्या काटेरी झुडपांच्या आतील बाजूस नेले. तेथे आरोपीने तिचा हात धरून “तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही” असे म्हणत जवळ ओढून मुलीशी लज्जा वाटेल असे कृत्य केले. तेव्हा पीडित मुलीने घाबरून त्याला असे काही करू नकोस असे म्हंटले असता, आरोपीने “तू मला बोलत व भेटत जा, नाहीतर मी माझ्या किंवा तुझ्या जीवाचे बरे वाईट करेन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदनशिव हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 4