सोलापूर – आज रोजी हरी ओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेच्यावतीने पूर्व विभागातील यंदाच्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच हरी ओम संस्थेच्या परिवारातील जे डॉक्टर कार्यरत आहे त्यांच्या डॉक्टर डे औचित्य साधून त्यांचे आज सकाळी साडेसात वाजता विणकर बागेत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष ,वृक्ष प्रेमी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे व नगरसेवक,प्रांत मंत्री,क्रीडा भारती,पश्चिम महाराष्ट्र ज्ञानेश्वर मॅकल यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत दंडी व आभार प्रदर्शन गणेश सिद्धम यांनी केले सदर कार्यक्रम ला संस्थेचे विश्वस्त संजीव नागरगी हिरालाल धुळम अशोक यज्जा संस्थेचे अध्यक्ष बालाजी जंगम उपाध्यक्ष इराण्णा चंशेट्टी व संस्थेचे पदाधिकारी व बहुसंख्य सभासद आणि विणकर बागेतील नागरिक उपस्थित होते .

संस्थेचे अध्यक्ष जंगम यांनी संस्थेने करत असलेले कार्याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्याकाल यांनी हरी ओम संस्था करत असलेले कार्याबद्दल कौतुक केले. सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पूर्वी चार्टर्ड अकाउंटंट काही समाजाचे लोक उत्तीर्ण व्हायचे परंतु पूर्वभागातील विणकर व कष्टकरी समाज सुद्धा शिक्षण क्षेत्रात आपले ठसा उमटवत आहे. असे आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले. त्याच प्रमाणे दुसरा प्रमुख पाहुणे डॉ कोठे यांनी सुद्धा डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी खूप मेहनत, कष्ट, जिद्द अंगी बाळगल्यास यश संपादन करता येतो. असे सांगितले त्याच प्रमाणे झाडे लावा झाडे जगवा याचे महत्त्व सांगितले.
सत्कार झालेले प्रत्येक विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त केले. हरी ओम संस्थेने सत्कार केल्याबद्दल आभार मानले.
खालील चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थ्यांचे नावे
१) कुमारी श्रेया श्रीनिवास वंगा
२) आकाश संतोष अंकल
३) गौतम बालाजी दिकोंडा
४) विनायक अनिल गुंडला
५) कुमारी वसुंधरा अनिल गुंडला
खालील डॉक्टरचे नाव
१) डॉ राघवेंद्र संजीव नादरगी
२) डॉ अंकिता राजू गुज्जा
३) डॉ निहारिका लालचंद धुळम
Post Views: 16