सोलापूर – येथील चेतक स्केटिंग क्लबच्या १०० दिवसांच्या ८४ व्या शिबिराच्या सांगतेनिमित्त स्केटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच तिरंगा बंगला येथे उत्साहात पार पडला.

या स्पर्धा ६ वर्षे, ९ वर्षे, १२ वर्षे, १५ वर्षांखालील आणि खुला गट अशा वेगवेगळ्या ६ गटांमध्ये मुले व मुलींसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना नगर रचना विभागाचे इंजिनियर श् अरविंद जगताप व प्रशिक्षक दिव्यकांत गांधी यांच्या हस्ते ‘गोल्डन स्मृतिचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी सद्भावना संस्थेच्या रोशन शेख, सोना गांधी, श्रुती गांधी यांच्यासह बहुसंख्येने मुलांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.





















