जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व मनपा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय गतका मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी नाईट कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी 19 वर्षे वयोगटात वर्चस्व राखत यश मिळविले त्यांची पुणे विभागीय शालेय घटका स्पर्धेसाठी निवड झाली असून यशस्वी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे
सांघिक फरी सोटी मध्ये सुवर्णपदक
कृष्णा परळकर, सोहन चंदनशिवे, हर्षद पांढरे, कृष्णा शिरसागर (सुवर्णपदक)
वैयक्तिक
कृष्णा परळकर सुवर्ण,
प्रथमेश वाकसे सुवर्ण,
सांघिक सिंगल सोटी (रजत पदक)
स्वरीत जाडकर, ऋषिकेश लोंढे, आमिर शेख, प्रथमेश वाकसे
या सर्वांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष माजी महापौर मनोहर सपाटे, सचिव प्रा महेश माने, शालेय समिती चेअरमन प्रा राजेंद्र शिंदे, वरिष्ठ महाविद्यालयाचे डॉ नितीन मोटे,प्राचार्य प्राचार्य सौ सुजाता जुगदार, नाईट कॉलेज प्राचार्य सौ एम डी पाटील, प्रा संतोष गवळी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी खेळाडूंना, प्रा सचिन गायकवाड, रमेश दोडमणी , आर्यन चव्हाण, मारुती घोडके, प्रा अश्विन नागने, प्रा जगन्नाथ पांढरे, प्रा हरीश गरड यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 11