अक्कलकोट – अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देऊन, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एका दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्याबद्दल श्री स्वामी समथॅ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्यावतीने आमदार- सचिन कल्याणशेटटी यांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अक्कलकोटसाठी ऐतिहासिक बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार- सचिन कल्याण शेटटी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे श्री स्वामी समर्थ नगरीचा विकास नव्या उंचीवर पोहोचेल. त्याबद्दल जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष- मिलन कल्याणशेटटी,उपनगराध्यक्ष – ॠतुराज तथा बंटी राठोड,जेषठ नगरसेवक – व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष- महेश इंगळे,नगरसेवक – यशवंत तात्या धोंगडे,महेश हिंडोळे, सुनिल सिध्दे, प्रविण शहा,सद्दाम शेरीकर, शिवराज स्वामी,न्यासाचे विश्वस्त – संतोष भोसले, क्रियाशील सदस्य- मनोज निकम व आशपाक काझी,महांतेश स्वामी आदिजनं उपस्थित होते.
Post Views: 15