
सोलापूर – श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय येथील बाह्य रुग्ण विभाग येथे स्वच्छता अभियान अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संपत्ती तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. स्वच्छता अभियानाची सुरुवात ओपीडी समोरील डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पुतळ्यास डॉ. संपत्ती तोडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सदरील स्वच्छता अभियानात रुग्णालयाचे कायम वर्ग 4 कर्मचारी, रोजंदारी मजूर BVG कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक व मुकादम असे 60 ते 65 कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. स्वच्छता अभियानामध्ये ओपीडी बाहेरील परिसर व आतील परिसर स्वच्छत करून घेण्यात आला. आतील व बाहेरील परिसर मध्ये एकूण 60 कॅरीबॅग कचरा गोळा करण्यात आला.
स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व मुकदम, स्वच्छता निरीक्षक तसेच वॉर्ड मध्ये रात्र पाळीस असलेले सर्व कर्मचारी यांच्या संयुक्त मदतीने सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.



















