अक्कलकोट – महाविद्यालयातील अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा विद्यार्थी सेवा प्रशासन व्यवस्था आदीची गुणवत्ता नॅक समितीकडून तपासून घेतल्यास महाविद्यालयास नॅकचे मानांकन प्राप्त होते त्यानंतर राष्ट्रीय अनुदान मंडळाकडून भरघोस आर्थिक निधी देखील उपलब्ध होतो म्हणून महाविद्यालयांनी स्वतःच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी नॅक मूल्यांकन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा डॉ सिद्राराम पुजारी यांनी केले
महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था संचलित मातोश्री गुरु बसवा कल्याण शेट्टी महाविद्यालयात विद्यापीठाच्या सूचनेनुसार नॅक मूल्यांकन व पुनर्मल्यांकन प्रेरित कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते व्यासपीठावर संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती प्राचार्य डॉ दिगंबर झोंबाडे प्राध्यापिका डॉ लक्ष्मी मुशन समन्वयक मलकप्पा भरमशेट्टी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे नॅक समन्वयक प्रा हर्षदा गायकवाड प्रा राजशेखर पवार उपस्थित होते
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ दिगंबर झोंबाडे म्हणाले की नॅक मूल्यांकनामुळे महाविद्यालय प्राचार्य व शिक्षकांना स्वतःच्या कार्यपद्धतीचे वस्तुनिष्ठ परीक्षण करता येते. संस्थेला देखील आपली बलस्थाने आणि करावयाच्या सुधारणाचा अंदाज येतो विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देता येते म्हणून नॅक मूल्यांकन करणे आवश्यक आहे
प्रा डॉ लक्ष्मी मुशन म्हणाल्या की नॅक मानांकनामुळे विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि समाजाचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो. चांगली ग्रेड प्राप्त झाल्यास संस्थेस व प्राध्यापकांना संशोधन, शैक्षणिक सहकार्य, सरकारी अनुदाने आणि विविध विकास योजनांमध्ये अधिक संधी मिळते. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते.
प्रारंभी पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले आभार प्रा सौरभ भस्मे यांनी मानले कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते
चौकटीतील मजकूर
नॅक चे नवीन पोर्टल कार्यान्वित होताच महाविद्यालयाचे मूल्यांकन होईल
उत्कृष्ट अध्यापन, पारदर्शक प्रशासन, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीच्या जोरावर नवीन पोर्टल कार्यान्वित होताच आमचे महाविद्यालय नॅक मूल्यांकनासाठी सामोरे जाणार आहे असे मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी आपल्या भाषणातून सांगितले
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात नॅक मूल्यांकन प्रेरित कार्यशाळेत बोलताना प्राध्यापक डॉ सिद्राम पुजारी मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Post Views: 9