बार्शी – एमआयटी रेल्वे अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या ‘स्पेस’ (कौशल्यविकास व प्रगती संघटना) समितीचा शुभारंभ उत्साहात झाला. यावेळी ‘स्पेस’ उपक्रम महोत्सवाचा समारोप तसेच विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला.
यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, नगरसेवक महेदीमिया लांडगे, प्राचार्य मधुकर लेंगरे व संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख सोमनाथ मुळे उपस्थित होते.
अक्षय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून दूर राहून कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले. तैमूर मुलानी यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करण्याचे आवाहन केले, तर प्राचार्य मधुकर लेंगरे यांनी अभ्यासासोबत सांस्कृतिक व अभ्यासेतर उपक्रमांत सहभागी होण्याचे सांगितले.
‘स्पेस’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता, नेतृत्वगुण व संघभावना विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या नृत्य व गायन सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल खांडेकर, शुभम लांडे, रेहान तांबोळी, तन्मय कुलकर्णी, आकिब मुल्ला, रितेश लोहार, अजिंक्य व्हटकर, वैष्णवी जाधव, वैभवी कुलकर्णी, अनुष्का खाडे, मानसी मांडवकर, कल्याणी सदावर्ते, जगदीश झटे, प्रथमेश महाडिक, सनत इराबत्ती, दिग्विजय कदम, ऋषिकेश कदम, शाम आघाव, प्रथमेश निरंजन, समर्थ मस्के, विरेन पाटील, फैझ तांबोळी, दिव्या यादव व योगिता मोरे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी योगदान दिले.
‘स्पेस’च्या समन्वयक अमृता देशमुख व साक्षी पारखे तसेच संगणक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 12