सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विकसित भारत संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रा उत्साहात पार पडली. ड्रिम पॅलेस, पोलीस कल्याण केंद्राजवळ झालेल्या सभेला नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनसेवेच्या उपक्रमांची माहिती संगीतमय पथनाट्याद्वारे देण्यात आली. विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी नागरिकांचा सहभाग, सेवा आणि राष्ट्रनिर्माणाची भावना यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.यानंतर पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सेवा ज्योती यात्रेला सुरुवात करण्यात आली. ड्रिम पॅलेस येथून निघालेली यात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत चार हुतात्मा पुतळा येथे पोहोचली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’सह राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणाऱ्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, माजी महापौर कांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, नगरसेवक विनोद भोसले, बिज्जू अण्णा प्रधाने, सुधा अरळीमोरे, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, नगरसेवक मेघनाथ येमूल, नागेश खरात, नागेश सरगम यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासह विकसित व आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी जनसहभाग वाढविण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला.
—
Post Views: 18