सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आत्मनिर्भर वस्ती स्तर संघाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरच्या माजी महापौर नलिनीताई चंदिले होत्या. त्यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाचे वाचन करन्यात आले
संघाच्या अध्यक्षा सौ. सुनीता नंदू दळवी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असून, प्रत्येकाने संविधानातील मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका नंदा कांगरे,शशिकला ढगापुरे, रूपाली चराटे, मीना खंडागळे, प्रज्ञा कुलकर्णी, गीता यादव, प्रियांका कांबळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
Views: 89