बार्शी – येथील धनश्री फोटो स्टुडिओचे मालक संतोष गोवर्धन जाधव यांचे चिरंजीव पियुष जाधव यांनी सनदी लेखापाल (सी.ए.) परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
पियुषने सी. ए. परीक्षेसाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यास व मानसिक तयारी केली होती. पियुष जाधव याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोजर इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाले.
वाणिज्य शाखेतील ही कठीण व प्रतिष्ठित मानली जाणारी परीक्षा त्याने स्वत:चे परिश्रम व कौटुंबिक पाठब्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
Post Views: 11