पिलीव – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील एका रिक्त असणाऱ्या आशा स्वयसेवीकेच्या जागा भरण्यासाठी शासनाकडून रितसर प्रक्रीया राबविण्यात आली होती .यामध्ये या पदासाठी झिंजेवस्ती गावातुन एकुण 14 अर्ज प्राप्त झाले होते .माञ झिंजेवस्ती गावातील कोणत्याही महीलेची सदरच्या जागेसाठी नियुक्ती न करता गारवाड येथील नसीमा आतार यांची याठिकाणी आशा स्वयंसेविका म्हणून नियुक्ती करण्यात आली होती .गावातील महीलेला डावलून बाहेरगावच्या महीलेची नियुक्ती केल्यामुळे झिंजेवस्ती येथील ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले .या नियुक्ती विरोधात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे, जिल्ह्य अधिकारी सोलापूर, जिल्ह्य वैद्यकीय अधिकारी सोलापूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, सभापती माळशिरस पंचायत समीती यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या .तसेच ग्रामसभेत नागरिकांनी आक्रमक होत पिलीवचे वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारला.अखेर माळशिरस तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ जानकर यांनी नियुक्त केलेल्या नसीमा आतार यांना नोटीसीदवारे झिंजेवस्ती येथील रहिवाशी असल्याचे भक्कम पुरावे सादर करण्याचे आदेश दिले माञ दिलेल्या मुदतीत त्यांनी कोणतेही पुरावे यामध्ये मतदार यादीतील नाव,रेशनकार्ड मधील नाव ,ग्रामपंचायत रहिवाशी दाखल यापैकी कोणताच पुरावा सादर न केल्यामुळे नसीमा आतार यांची झिंजेवस्ती येथे आशा स्वयसेवीका म्हणून केलेली निवड रद्द करण्यात येत असल्याचे रितसर पञ 6 जुलै रोजी माळशिरस पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जानकर यांनी त्यांना दिले आहे.याबाबत जिल्ह्य वैद्यकीय अधिकारी सोलापूर, गटविकास अधिकारी माळशिरस पंचायत समीती व वैद्यकीय अधिकारी पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्र यांना याबाबत पञादवारे कळविण्यात आले आहे. चौकट _ या नियुक्ती बाबत झिंजेवस्ती ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मदने सर तसेच अशोक हरी मदने यांनी आवाज उठवून याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करीत आवाज उठवून प्रशासनास निवड रद्द करण्यास भाग पाडले . चौकट _ माळशिरस तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जानकर यांची या निवडीबाबतची भुमीका संशयास्पद राहीली कारण निवड केल्यावर याबाबत त्यांना विचारले असता त्यांचे सर्व पुरावे हे झिंजेवस्ती येथीलच असुन ही निवड शासनाच्या नियमानुसार पारदर्शक पणे केली असल्याचे सांगीतले होते .माञ हे निवड प्रकरण अंगलट येण्याचे दिसताच त्यांनीच 6 जुलै रोजी निवड रद्द केली .एकंदरीत याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांच्याशी गेल्या चार दिवसांपासून मोबाईलवर संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला माञ त्यांनी मोबाईल उचललाच नाही. चौकट _ झिंजेवस्ती येथे बाहेरच्या आशा सवयसेवीकेची निवड ही मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या वरदहस्तामुळे झाली असल्याचा आरोप माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मदने सर यांनी केला आहे.