सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रभाग क्रमांक ४ चे कार्यकुशल नगरसेवक तथा मराठा समाजाचे नेते अनंत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व एलसीडी रायटिंग टॅबलेटचे वाटप, वृक्षारोपण, अनाथ आश्रमातील बालकांना भोजन तसेच महिलांसाठी शासकीय योजनांच्या नोंदणी शिबिरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना एलसीडी रायटिंग टॅबलेटचे मोफत वाटप करण्यात आले. माजी परिवहन सभापती गणेश जाधव यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच आयोजित भव्य रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. अनाथ आश्रमातील बालकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली, तर महिलांसाठी महिला सन्मान योजनेच्या कार्ड नोंदणी शिबिराद्वारे विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रक्तदान शिबिरास आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदिच्छा भेट देत नगरसेवक अनंत जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार दिलीप माने, भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सामाजिक कार्यकर्ते सुधीर खरटमल, शहर सुधारणा समितीच्या सभापती स्वाती बडगु, मंडई व उद्यान समितीचे सभापती राजशेखर पाटील, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, नगरसेवक डॉ. किरण देशमुख, संजय कोळी, शिवानंद पाटील, राजकुमार पाटील, विनायक विटकर, दशरथ कसबे, प्रभाकर काशिद, दिलीप कोल्हे, तात्यासाहेब वाघमोडे, अजित गायकवाड, विनोद भोसले, जयकुमार माने, नागेश खरात, समाधान आवळे, दीपक जमादार, बिपीन धुम्मा, बिज्जू प्रधाने, जॉन फुलारे, श्रीकांत डांगे, राम जाधव, अॅड. योगेश पवार, प्रसाद लोंढे, पंकज काटकर, समर्थ बरडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन अनंत जाधव यांचा सत्कार केला व त्यांच्या पुढील सामाजिक व लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रभाग क्रमांक ४ मधील धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, संभाजी राजे तालीम परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी श्री सिद्धेश्वर ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.सामाजिक जाणीव, सेवाभाव आणि लोकहिताचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
Post Views: 12