पंढरपूर – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित, द. ह. कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत यशाचे नवनवीन शिखरे सर केली आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असून, या निकालाने पुन्हा एकदा शाळेची शैक्षणिक परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत प्रशालेचा विद्यार्थी
चि. प्रणव किरण धावडकर याने अत्यंत जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत राज्याच्या गुणवत्ता यादीत ‘नववा’ क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामागे जेष्ठ शिक्षक समीर दिवाण,आर. डी.जाधव , व्ही.एस. वेळापूर , एस. एम.,हिंगणकर सौ. सोनाली वरकुटे (इंगळे), सौ. सावरकर, संजय गवळी, सौ. फडके, सौ. गायकवाड आणि कुमारी शिंदे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच विद्यार्थ्यांना हे यश संपादन करता आले.
———–
चौकट : (संस्था पदाधिकारी व मुख्याध्याप कांकडून अभिनंदन)
विद्यार्थ्यांचे हे यश पाहता, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. नानामालक कवठेकर, चेअरमन वीणाताई जोशी मानद सचिव श्री. पटवर्धन सर, श्री. अभ्यंकर तसेच सर्व सदस्य, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम. कुलकर्णी , उपमुख्याध्यापिका सौ. विश्वासे एस. आर., पर्यवेक्षक जे. एम.शेलार, जेष्ठ शिक्षक प्रशांत मोरे, श्री. पाटोळे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 7