दिनांक 26 सप्टेंबर रोजी राजीव गांधी स्टेडियम येथे 14 वर्षाखालील शहरस्तरीय स्पर्धेत दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेचा संघ विजयी झाला.
पहिला सामना सुयश विद्यालय संघा विरुद्ध झाला. या सामन्यात गुणफलक 12/04 असा होता. सामना एकतर्फी केला तर या सामन्यात तेजस बस्ते 3 गोल, कार्तिक कोळेकर 2 गोल, महारुद्र परचंडे 2 गोल.
अंतिम सामना हा अरिहंत स्कुल या संघाविरुद्ध झाला अंतिम सामन्याचा गुणफलक
16/00 असा होता. तर या सामन्यात तेजस बस्ते 4 गोल, 4 यशराज सूर्यवंशी 3 गोल,वेदांत पुजारी 3 गोल, कार्तिक कोळेकर 3 गोल, रितेश भोसले याने गोल रक्षक म्ह्णून उत्कृष्ट कामगिरी केली. हा विजेता संघ संगमनेर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी 4/10/2026 तारखेचा रवाना होणार आहे.
या विजेत्या संघांचे संस्थेचे स्थानिय सचिव डॉ.महेश जी चोपडा संस्थेचे प्रशासक व्ही. बी. उबाळे मुख्याध्यापिका मनीषा पाटील तसेच पर्यवेक्षिका सुनिता गवळी यांनी अभिनंदन केले तर हया विजेत्या संघास प्रमोद कुनगुलवार क्रीडाशिक्षक यांनी विजेत्या संघास मार्गदर्शन केले.
Post Views: 19