सांगोला – जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय १४ वर्षे वयोगट क्रिकेट स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल, सांगोला या संघाचा पराभव करत निर्विवाद विजेतेपद पटकावले. यशस्वी खेळाडूंचा सत्कार संस्थेचे खजिनदार शंकरराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक शुभांगी घोंगडे, मकरंद अंकलगी उपस्थित होते. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक नरेंद्र होनराव, प्रा.प्रशांत बुरांडे, सुनील भोरे, प्रा.डी.के.पाटील, प्रा.सचिन चव्हाण, सुभाष निंबाळकर, प्रा.संतोष लवटे आणि स्नेहल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्था अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्था उपाध्यक्ष ऍड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, पर्यवेक्षक काकासो नरूटे यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
चौकट-
सांगोला विद्यामंदिरचा यशस्वी क्रिकेट संघ-
श्रेयश ढाकणे (कर्णधार), ईशान कांबळे, प्रणव केदार, अर्णव मुंढे, कुणाल खिलारे, सार्थक माळी, विराज भोसले, पियुष शेजवळ, सत्यम पाटील, साई शेंडे, शौर्य नवले, तेहजीब मुल्ला, अब्दुलमन्नान मुजावर, आदर्श बनसोडे