सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मिळकतकराच्या एकरकमी भरण्यावर मिळणाऱ्या सवलतीची मुदत आता ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. मिळकतदारांची मागणी तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षातील मिळकतकराची देयके ६ एप्रिल २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली होती. तसेच एसएमएसद्वारेही कर भरण्याची लिंक वेळोवेळी पाठविण्यात आली. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (SIR) मोहिमेमुळे छापील देयकांचे वितरण सर्व मिळकतदारांपर्यंत पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे करदात्यांची गैरसोय टाळण्यासाठी सवलतीची मुदत वाढविण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.छापील देयकांचे वाटप काही प्रमाणात करण्यात आलेले आहे. सध्या शासनाकडून मतदार विशेष सखोल पुर्नरिक्षण कार्यक्रमाचे (SIR) कामकाज सुरु असल्याने छापील देयके सर्वांना वाटप करणे शक्य झालेले नाही. तथापी छापील देयकांची छपाई करणेस काही कालावधी लागणार असल्याने महानगरपालिका मिळकत कर भरण्यासाठी
https://smctaxcaic.solapurcorporation.org/counte _receipt_online.aspx या संकेतस्थळावर ऑनलाईन सेवा यामध्ये “मिळकत कर भरणे” हा पर्याय निवडून मिळकत भरता येईल. तसेच मिळकत कर भरण्याकरीता फोनपे, गुगलपे अशा सर्व प्रकारच्या पेमेंट गेटवेची सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘मिळकत कर भरणे’ या पर्यायाद्वारे नागरिकांना ऑनलाइन कर भरता येणार आहे. तसेच फोनपे, गुगल पेसह विविध डिजिटल पेमेंट गेटवेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कराचे देयक प्राप्त झाले किंवा झाले नाही, तरी ३१ ऑगस्टपूर्वी मागील सर्व थकबाकीसह चालू वर्षाचा मिळकतकर एकरकमी भरावा. ऑनलाइन कर भरल्यास ६ टक्के, तर रोखीने किंवा धनादेशाद्वारे कर भरल्यास ५ टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.
महापालिका उपायुक्त (कर) सोनाली यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्व मिळकतदारांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन वेळेत कर भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
—