Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेत अपुऱ्या निधीसह योजनांच्या अंमलबजावणीचे आव्हान !

तरुण भारतbyतरुण भारत
August 3, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची आज होणारी बैठक ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामांपासून ते ग्रामपंचायतींमधील प्रशासकीय अडचणी, निधीअभावी संथावलेल्या विकासकामांपर्यंत अनेक प्रश्नांवर सदस्य प्रशासनाला जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत केवळ विषयांची चर्चा होणार की ठोस निर्णयही घेतले जाणार, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.
            राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागात पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि पायाभूत विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र निधीचा तुटवडा आणि प्रशासकीय अडचणींमुळे अनेक योजना कागदावरच अडकून पडल्याचे वास्तव आहे. याचा थेट परिणाम गावांच्या विकासावर होत असून ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.
          जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजनांची कामे ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत. मात्र २०० हून अधिक कामांची बिले अद्याप प्रलंबित आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुमारे १३५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली असताना केवळ ६ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत आले असून अनेक कामांचा वेग मंदावला आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळण्यास विलंब होत आहे.
            याशिवाय राज्यातील ७५० हून अधिक ग्रामपंचायतींवर प्रशासक कार्यरत असल्याने अनेक विकासकामांचे प्रस्ताव आणि आर्थिक मंजुरी रखडल्याची परिस्थिती आहे. काही गावांमध्ये विकास कामे झाले आहेत. परंतु सहीचा अधिकार नसल्यामुळे निधी अखर्चित राहिले आहेत. आषाढी वारीदरम्यान वारी मार्गावरील काही ग्रामपंचायतींचे अधिकार ग्रामसेवकांना देण्यात आले असले तरी इतर ग्रामपंचायतींच्या अधिकारांचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेलाही फटका बसत आहे.
            जल जीवन मिशन, १५ वा वित्त आयोग, नाविन्यपूर्ण योजना यासह जन सुविधा, नागरी सुविधा, तसेच जिल्हा परिषद सेस, जिल्हा नियोजन समिती आणि आमदारांचा निधी माध्यमातून होणारी योजनांची कामे, त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाच्या इतर योजनांची अंमलबजावणीही अपेक्षित गतीने होत नसल्याने ग्रामीण भागात विकासकामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये मंजूर कामे निधीअभावी अपूर्ण राहिली असून नागरिकांकडून सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे.
         आजच्या बैठकीत सदस्यांनी या सर्व प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाकडून वस्तुस्थिती जाणून घेणे, प्रलंबित बिलांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, रखडलेल्या योजनांना गती देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करणे आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. यानंतरच खऱ्या अर्थाने स्थायी समितीतील चर्चेनंतर ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळते की प्रश्न पुन्हा एकदा कागदावरच राहतात, याचे उत्तर आजच्या बैठकीतून स्पष्ट होणार आहे.
चौकट
लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांचा जिप सेसवर डोळा
ग्रामीण भागातील वाड्या – वस्त्यांचा विकास व्हावा यासाठी ग्रामविकास विभागामार्फत योजना राबवल्या जातात. परंतु त्याची अंमलबजावणी म्हणावी तशी होते का नाही. हेदेखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशातच गावातील विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी ग्रामविकास विभागासह आमदारांचा फंड खासदारांचा फंड उपलब्ध असतो. परंतु अशा परिस्थितीत देखील जिल्हा परिषदेच्या सेस फंडावर आमदारांसह कार्यकर्त्यांचा जास्त भार दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या सेस मधून कामे करून घ्या असा, आग्रह नेत्यांचा दिसून येत आहे.
Post Views: 10
Previous Post

शेख नरुद्दीन बाबा यांच्या उरूस निमित्त प्रसाद वाटप

Next Post

मिळकतकरावर ६ टक्के सवलतीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मिळकतकरावर ६ टक्के सवलतीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024576

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!