Saturday, August 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकरी योजनांना ‘बूस्टर डोस’ची मागणी; कृषी विभागासाठी सात कोटींच्या निधीचा आग्रह

तरुण भारतbyतरुण भारत
May 21, 2026
in solapur
0
शेतकरी योजनांना ‘बूस्टर डोस’ची मागणी; कृषी विभागासाठी सात कोटींच्या निधीचा आग्रह
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाचा निधी वाढवण्याची जोरदार मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सध्या कृषी विभागाकडे केवळ तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून तो अत्यंत अपुरा असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हा निधी वाढवून किमान सात कोटी रुपये मंजूर करावेत, असा आग्रह सभागृहात धरण्यात आला.
         खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांना बियाणे, खत, सिंचन, पीक संरक्षण आणि शेतीपूरक योजनांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. मात्र निधीअभावी अनेक योजना अर्धवट राहात असून लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळत नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली. कृषी विभागाकडे पुरेसा निधी नसल्याने शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांवर मर्यादा येत असल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला.
          कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी यावेळी कृषीप्रधान देशातच कृषी विभाग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याची खंत व्यक्त केली. मात्र आता जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आल्याने शेतकऱ्यांसाठी विशेष निधी उपलब्ध करून विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. निधीवाढीसाठी अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
        दरम्यान, शेतकरी हिताच्या योजना प्रभावीपणे राबवायच्या असतील तर निधी वाढ अपरिहार्य असल्याचे मत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून कृषी विभागासाठी वाढीव निधी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सभेत दिले.
चौकट
पशुसंवर्धन विभागातील भरती प्रक्रिया लवकरच
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पशुसंवर्धन विभागातील विविध प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा त्वरित भरणे आवश्यक असल्याचे या सभेत नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने लवकरच यावर कार्यवाही केली जाईल. संबंधित शिक्षण पात्रता असलेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया जाईल, असे संकेत ही सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी दिले.
Post Views: 51
Previous Post

गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम विद्यार्थी आणि हरित भविष्याचा संकल्प – चेतनसिंह केदार सावंत

Next Post

जय हिंद कुर्डूवाडीची ‘न्यू लाईफ’वर  मात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जय हिंद कुर्डूवाडीची ‘न्यू लाईफ’वर  मात

जय हिंद कुर्डूवाडीची 'न्यू लाईफ'वर  मात

ताज्या बातम्या

दत्तक लेकीचे मुख्यमंत्र्यांनी केले विधिवत पुनर्विवाह #viral #maharashtranews

August 22, 2026

अखेर तिने मागितली माफी….. #viral

August 22, 2026

अवघड झाले cjp वाल्यांचे…… #viral

August 22, 2026

रागात डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई वडिलांचाही मृत्यू #viral #marathinews

August 22, 2026

सोलापूर जिल्ह्याला मिळाले शासकीय रेखाकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्र

August 21, 2026
घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

घरामागे गांजाची लागवड; १० किलो गांजा जप्त

August 21, 2026

अभय योजनेत ८५५ गाळेधारकांना ५८.८३ लाखांची दंडमाफी

August 21, 2026

चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना 13 सायकलचे वाटप

August 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1101138

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!