सोलापूर – जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालय येथील प्रशासकीय कामकाज, अनुदानित वसतिगृहांशी संबंधित प्रस्तावांची हाताळणी आणि कनिष्ठ लिपिक मल्लिकार्जुन मळगे यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध स्तरांतून गंभीर आरोप व तक्रारी समोर येत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी दक्षिण सोलापूर तालुका युवक काॅंग्रेसचे माजी कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सचिन व्हनमाने यांनी केली आहे. त्यांनी कनिष्ठ लिपिकाच्या कार्यपध्दती विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात १५० पेक्षा अधिक अनुदानित वसतिगृहे असून, त्यांच्याशी संबंधित इमारत भाडे, विद्यार्थी संख्या, तपासणी, अनुदान प्रस्ताव, मंजुरी, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर प्रशासकीय बाबींची जबाबदारी समाजकल्याण विभागाकडे आहे . अनेक वसतिगृहांच्या प्रस्तावांवर प्रत्यक्ष स्थळपडताळणी, विद्यार्थी उपस्थिती आणि आवश्यक कागदपत्रांची योग्य तपासणी न करता कार्यवाही केली जात असल्याचा संशय आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, काही इमारतींची उपलब्धता आणि शासनाच्या निकषांनुसार पात्रता नसतानाही कागदपत्रांच्या आधारे प्रस्ताव पुढे पाठवले जात असल्याचे आरोप करण्यात आली आहे. काही इमारतींची कागदपत्रे बोगस किंवा संशयास्पद पद्धतीने वापरून अनुदान मिळवून देण्यासाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोपही तक्रारकर्त्यांनी केला आहे.
काही संस्थांना जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील काही वर्षांतील वसतिगृहांच्या सर्व फाईली, मंजुरी आदेश, तपासणी अहवाल, विद्यार्थी उपस्थिती नोंदी, इमारत भाडे करारपत्रे आणि अनुदान वितरणाची कागदपत्रे यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित वसतिगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याऐवजी कार्यालयीन कागदपत्रांच्या आधारे अनेक प्रस्तावांवर कार्यवाही केली जात असल्याचा संशय आहे.
त्यामुळे शासनाच्या
निधीचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्थळपडताळणी अहवाल, तपासणी पथकांच्या भेटी, उपस्थिती नोंदी आणि अनुदान वितरण यांचा परस्पर मेळ तपासण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
…
चौकट
….
नियमबाह्य कार्यभाराचा मुद्दा ऐरणीवर
…
संबंधित कर्मचारी लिपिक पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडे लेखा विभागाचा कार्यभार कोणत्या प्रशासकीय आदेशानुसार सोपविण्यात आला ? यापूर्वी त्या लिपिका विरोधातील तक्रारींची माहिती देण्यात मागणी करण्यात आली आहे. तसेच त्या लिपिकाशी संबंधित विभागाचे स्वतंत्र चौकशी कयून कारवाई करण्याची मागणी व्हनमाने यांनी केली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















