सोलापूर : जुना विडी घरकुल येथील सहसूत मार्कंडेय गृहनिर्माण संस्था, हैदराबाद रोड येथे रस्त्यावरच अतिक्रमण करून पत्रा शेड आणि आजोरा टाकण्यात आला आहे. ते हटवून रस्ता मोकळा करावा अन्यथा महापालिका आवारात आत्मदहन करण्याचा इशारा संजीव मिठ्ठा यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
जुना विडी घरकुल येथील सहसूत मार्कंडेय गृहनिर्माण संस्था येथे रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण करून पत्रा शेड मारण्यात आले आहे. या ठिकाणी आजोरा टाकण्यात आला आहे. यामुळे या नगरातील लोकांना रस्त्यावरून ये- जा करणे अडचणीचे ठरत आहे. महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार अर्ज, निवेदन दिली मात्र कार्यवाही झाली नाही. चार गृहनिर्माण सस्थांचा येण्या-जाण्याचा रस्ता हाच आहे. यापूर्वी येथील अतिक्रमित रूम पाडली मात्र इतर एक पत्रा शेड आणि आजोरा जैसे थे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक अडचणींना येथील नागरिकांना तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे तातडीने हा रस्ता पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करून वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी संजीव मिठ्ठा यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेस ॲड. राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.
Post Views: 8