Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सर्वात अधिकवेळा अजितदादांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले

तरुण भारतbyतरुण भारत
January 29, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांनी सर्वांत जास्ती वेळा भूषविले आहे. एकीकडे सर्वात अधिकवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याचा त्यांच्या नावावर विक्रम झालेला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री म्हणून विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी केवळ दोन वेळाच त्यांना संधी मिळाली आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आषाढी यात्रेच्या वेळी विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी येण्याचे दादांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले आहे. कारण विमान अपघातात मंगळवारी (ता.२८) दादांचा दुर्देवी मृत्यु झाला.  

राज्याचे आराध्य दैवत आणि गोरगरीबांचा बालाजी म्हणून विठ्ठलाची सर्वदूर खात्यी आहे. दरवर्षी पंढरपूरात चार मोठ्या यात्रा भरत असतात. त्या चार यात्रांमध्ये आषाढी आणि कार्तिकी यात्रेला विशेष महत्व आहे. आषाढी यात्रेच्या वेळी देहू,आळंदीसह राज्याच्या विविध भागातून विविध संतांचे पालखी सोहळे पंढरपूरात विठ्ठलाच्या भेटीसाठी येत असतात. त्यामुळे आषाढी यात्रेच्या वेळी पंढरपूरात लाखोंच्या संख्येने वारकऱ्यांची मांदियाळी असते. आषाढी यात्रेच्या वेळी राज्याचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापुजा करण्याची परंपरा आहे. मात्र राज्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युती शासनाच्या वेळी राज्यात भाजपासाठी खास उपमुख्यमंत्रीपद निर्माण केले गेले. तेव्हा पासून आषाढी यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री तर कार्तिकी यात्रेच्या वेळी उपमुख्यमंत्री राज्याचे प्रतिनिधी म्हणून विठ्ठलाच्या महापुजेसाठी येण्याची प्रथा सुरु झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांचा मित्रपक्ष असलेली शिवसेना त्यांच्या बरोबर सत्तेत सहभागी झालेली होती. मात्र त्यावेळी भाजपासाठी उपमुख्यमंत्रीपद तयार करण्यात आलेले नव्हते. त्यावेळी सुरुवातीला एकनाथ खडसे यांची महसूलमंत्रीपदी त्या नंतरच्या काळात चंद्रकांत पाटील यांची या पदावर वर्णी लावण्यात आली होती. त्यामुळे त्या टर्म मध्ये उपमुख्यमंत्र्यां ऐवजी महसूल मंत्र्यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याचा मान देण्यात आलेला होता.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून २०२० आणि २०२१ मध्ये अजित पवारांनी विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी हजेरी लावलेली होती. त्या नंतर २०१४ मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्रीपदावर होते. त्यावेळी महसूल मंत्र्यांना हा पुजेचा मान देण्यात आलेला होता. त्या नंतर महसूल मंत्री पदावरुन खडसेंना पायउतार व्हायला लागल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात महसूल मंत्रीपदाची माळ पडली. त्यामुळे २०१५ पासून ते २०१९ पर्यंत सलग पाच वेळेला त्यांना पंढरपूरात येवून कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. दरम्यान अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून केवळ २०२० आणि २०२१ असे दोन वेळेलाच कार्तिकी यात्रेच्यावेळी विठ्ठलाची शासकीय महापुजा करण्याची संधी मिळाली. अजितदादांना अनेक वेळा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळेच अजितदादांचे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आषाढी यात्रेच्या वेळी विठुरायाच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याचे स्वप्न हे अखेर स्वप्नच ठरले.
—————-
चौकट :  ( कार्तिकीच्या महापुजेसाठीची यांची राहिली उपस्थिती )
लक्ष्मण ढोबळे ( पालकमंत्री २०१२).दिलीप सोपल (पालकमंत्री २०१३), एकनाथ खडसे ( महसूलमंत्री २०१४ आणि २०१५ ). चंद्रकांत पाटील ( महसूलमंत्री २०१६,२०१७,२०१८ आणि २०१९). अजित पवार ( २०२० आणि २०२१).देवेंद्र फडणवीस ( उपमुख्यमंत्री असताना २०२२ आणि २०२३), चंद्रकांत पुलकुंडवार ( विभागीय आयुक्त पुणे आचारसंहितेमुळे २०२४) त्या नंतर एकनाथ शिंदे ( उपमुख्यमंत्री २०२५)
———————
चौकट : केवळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद तसेच उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे या दोन जणांनाच आषाढीच्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आणि कार्तिकी यात्रेच्या वेळी उपमुख्यमंत्री म्हणून विठ्ठल रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी उपस्थित राहण्याची संधी मिळाली. 

Post Views: 92
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन ; सोलापूर महापालिकेला सुट्टी जाहीर

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इंद्रभुवनशी जुळलेली आठवण; सूक्ष्म निरीक्षण, वारशाविषयी जिव्हाळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इंद्रभुवनशी जुळलेली आठवण; सूक्ष्म निरीक्षण, वारशाविषयी जिव्हाळा

ताज्या बातम्या

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1244921

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!