पंढरपूर – आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या जीव रक्षकांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक करीत दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ केले. चंद्रभागा नदीचे स्नान करताना पाण्यात बुडणाऱ्या ३५ हून अधिक वारकऱ्यांचे प्राण या जीव रक्षकांना यश मिळाले आहे.
यंदाच्या आषाढी वारी मध्ये ३२ लाखांहून अधिक वारकरी भाविक सोहळ्यासाठी दाखल झाले होते. एकादशी सोहळ्यासाठी येणारा प्रत्येक वारकरी भाविक हा चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी आवर्जून हजेरी लावतो
चंद्रभागा नदीच्या स्नानासाठी गेलेल्या वयोवृद्ध भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्याने, ३५ हून अधिक भाविक पाण्यात बुडाले होते.
पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या भाविकांनी मदतीची हाक दिल्यानंतर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव रक्षक टीमचे सदस्य पाण्यात स्वतःला झोकून देत.
आपल्या या कामाची दखल शासनस्तरावर कोणी तरी घ्यावी या उद्देशाने जीव रक्षक टीमचे सदस्य साहिल माने यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची भेट घेऊन आपल्या कामाचे गाऱ्हाणे मांडले, श्री विठ्ठल मंदिर समितीच्या माध्यमातून आम्हाला कायम स्वरुपी काम द्या अशी मागणी केली.या तरुणांचे निस्वार्थी काम आणि सेवाभाव पाहून श्री.चिवटे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून आणली.
श्री. शिंदे यांनी या जीव रक्षकांच्या कामाचे तोंड भरुन कौतुक करीत दीड लाख रुपये बक्षीस म्हणून देऊ केले.
श्री. शिंदे यांच्या कौतुकाच्या थापेने जीव रक्षक तरुण अधिकच भारावून गेले. या भेटी दरम्यान जीव रक्षक साहिल माने यांनी मंदिर समिती मार्फत जीव रक्षकांना कायम नियुक्ती करावी अशी मागणी केली. यावर श्री. शिंदे यांनी सकारात्मक विचार करु असे आश्वासन दिले.
Post Views: 8