सोलापूर – तालुक्यातील कंदलगाव येथील राऊंड टेबल जीवनज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना एम.के.फौंडेशन व सागर सिमेंट लिमिटेड तर्फे “स्कूल चले हम” या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वह्या वाटप करण्यात आले.
सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी स्वर्गीय दी. शि. कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सहसचिव प्राध्यापक सुबोध कोळी सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सुबोध कोळी यांनी “मानवतेचे कर्म, सेवा हेच धर्म” हे ब्रीद घेऊन सागर सिमेंट लिमिटेड व एम.के.फौंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांच्या उपक्रमाचे व दातृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. खऱ्या अर्थाने आपण समाजाचा एक भाग आहोत व अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची आज समाजाला गरज असल्याचे विशद केले तसेच सदर उपक्रमासाठी प्रशालेतील सहशिक्षक आवटी सर यांच्या विशेष प्रयत्नांचेही कौतुक केले.
याप्रसंगी प्राचार्य आर. बी. यलगोंडे, पर्यवेक्षक एस.बी. जमादार, प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : एम.के.फौंडेशन व सागर सिमेंट लिमिटेड. तर्फे वह्या वाटप करताना सहसचिव प्रा.सुबोध कोळी, प्राचार्य आर. बी. यलगोंडे, पर्यवेक्षक एस.बी. जमादार व शिक्षक वृंद विद्यार्थी-विद्यार्थिनी
Post Views: 11