सोलापूर – येथील एनटीपीसी नोट्रे डेम अकॅडमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हार्मोनियम व गायन या संगीत विषयाच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हे यश विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, नियमित रियाज, पालकांचे मोलाचे सहकार्य आणि संगीत शिक्षक सिद्धाराम विभूते यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाचे फलित आहे.

विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे : मनोग्ना श्री जंगा,शिवांश कुमार सिंह, आवानी नांबियार, धीरज व्ही. आर., अदिती नांबियार,चरण पशुपती, आर. अंजन अभिराम, जंगा चार्विक नंदन, नीरज व्ही. आर.
—–
“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच विद्यालयाचा मुख्य उद्देश आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच संगीत, कला आणि संस्कार क्षेत्रातील असे यश विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक समृद्ध आणि परिपूर्ण करते.”
– सिस्टर रंजना जोसेफ, मुख्याध्यापिका























