सोलापूर : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांची जाणीव ठेवत OBL सामाजिक संस्था यांच्या वतीने पितापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना टिफिन, पाण्याच्या बॉटल्स आणि वह्यांचे वितरण करण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी OBL सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुल्फाम पठाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले. “तुम्ही शिक्षणात पुढे जा, मोठे व्हा; कोणतीही अडचण आली तर आम्हाला हाक मारा, OBL सामाजिक संस्था तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,” असे आश्वासक उद्गार त्यांनी काढले. त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि उत्साह संचारला.
या उपक्रमात इब्राहिम मुजावर यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शेवटी मौला मुदगल सर यांनी सर्व मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी इब्राहिम शेख, राज बागवान, सलमान सातखेड, मोसिन गोल्डन, एजाज तुळजापूरे, सैफ अली दिना, जुबेर मुजावर, मोहसीन मुजावर, सोनू कुरेशी आदी उपस्थित होते.

















