Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आम्ही एक कप चहासाठी सभेला येतो का?”; आषाढी वारीच्या सभेत सदस्य अण्णासाहेब ढाणे यांचा प्रशासनावर घणाघात

तरुण भारतbyतरुण भारत
June 25, 2026
in solapur
0
आम्ही एक कप चहासाठी सभेला येतो का?”; आषाढी वारीच्या सभेत सदस्य अण्णासाहेब ढाणे यांचा प्रशासनावर घणाघात

oplus_0

0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील गोपाळपूरमधील सोयरी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विकासकामे, पालखी मार्गावरील सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून जोरदार खडाजंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी प्रशासनावर सडकून टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. या विशेष बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे, गटनेत्या रश्मी बागल, मुख्यकार्यकारी अधिकारी कुशल जैन,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
      पुढे अण्णासाहेब ढाणे म्हणाले, “आम्ही सदस्य जनतेचे प्रश्न मांडतो, पण त्याची नोंदच होत नसेल तर सभा घेण्याचा उपयोग काय? आम्ही एक कप चहासाठी येथे येतो का? लोकांसमोर जाऊन काय सांगायचे?” असा सवाल करत ढाणे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवण्याची मागणी केली. “सभागृहाची चेष्टा करू नका, मनमानी कारभार थांबवा,” असेही ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला अनेक सदस्यांनी टाळ्या वाजवून समर्थन दिले.
           यावेळी अण्णासाहेब ढाणे यांनी पदाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील कथित संगनमतावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “टेंडरबाबत बैठक घेतली जाते; मात्र टेंडर आधीच मंजूर झालेले असतात. मग आम्हाला विचारण्याचा अर्थ काय? आम्ही वेडे आहोत का?” असा संतप्त सवाल त्यांनी केला.
           आषाढी वारीसाठी उभारण्यात येणाऱ्या जर्मन हँगर मंडपांवरही त्यांनी टीका केली. “अगोदर पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्त करा, खड्डे बुजवा. गेल्या वर्षी अनेक ठिकाणी जर्मन हँगर मंडप गळाले, काही ठिकाणी कोसळलेही होते. निधी आल्यानंतर विशेष सभा घेतली असती तर सदस्यांनी चांगल्या सूचना दिल्या असत्या,” असे त्यांनी सांगितले. स्वागत कमानी उभारण्याऐवजी वारकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी विविध मुद्द्यांवर खुलासा करताना निधी देण्यासंबंधी सकारात्मकता दर्शवली.
       सभेत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव गटाचे व्यंकट भालके यांनी वारीच्या काळात काही खाजगी डॉक्टर पंढरपूर शहर सोडून जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. वारी कालावधीत डॉक्टरांनी शहरातच उपलब्ध राहावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ठराव करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवावे, अशी मागणी करण्यात आली.
         दरम्यान, महिला सदस्यांनीही रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यामध्ये शन्मुखी कोरके, मयुरी बागल, गीतांजली साळुंखे, वंदना कांबळे यांच्यासह अन्य सदस्यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने ग्रामीण रस्ते आणि पाण्यासाठी वाढीव निधी देण्यासह मूलभूत सोई सुविधा देण्यासाठी विविध प्रश्न मांडले.
              बोरामणी गटाचे सदस्य खंडागळे यांनी गोळेगाव येथे शेगावच्या गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी कायमस्वरूपी सुविधा उभारण्याची मागणी केली. या ठिकाणी सुमारे एक हजार भाविक येत असल्याने सभामंडपासाठी १५ लाख रुपये, रस्त्यासाठी १५ लाख रुपये आणि स्ट्रीट लाईटसाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पालखी मार्गावरील गावांना वाढीव निधी देण्याची मागणीही त्यांनी केली. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी माळीनगर परिसरातील उड्डाणपूल, रस्ते, गटारी आणि इतर प्रलंबित कामांचे प्रश्न उपस्थित केले.
             आषाढी वारीच्या तयारीसाठी बोलावण्यात आलेली ही सभा विविध प्रश्नांवरून गाजली असून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत वारकऱ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली.
चौकट
या विषयांना देण्यात आली मंजुरी
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत जर्मन हँगर ८ कोटी, वॉटरप्रूफ मंडप ३.५ कोटी, औषध खरेदीसाठी १० कोटी, पाणीपुरवठ्यासाठी २ कोटी २८ लाख ,स्वागत कमानीसाठी ४ कोटी ४३ लाखाच्या कामांना या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
चौकट
समाज कल्याण समितीच्या सभापती संस्कृती सातपुते यांनी वारी व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी “प्री वारी आणि पोस्ट वारी ही संकल्पना मांडली. वारीपूर्व काळात आवश्यक सुविधा, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था, पाणीपुरवठा आणि रस्त्यांची तयारी यावर विशेष भर देण्यात यावा, तसेच वारीनंतर तात्काळ स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची पुनर्स्थापना आणि कामांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र नियोजन असावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सभेत पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, ग्रामपंचायतस्तरीय नियोजन, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा, रस्ते दुरुस्ती, निवास व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणा यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादर केली.
Post Views: 16
Previous Post

सोलापुरात शहरात १५ ऑगस्टपूर्वी धावणार ई-बस

Next Post

कुसमोड येथील नंदकुमार लोखंडे यांच्या दोन मोटारीची अज्ञात व्यक्ती कडुन चोरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कुसमोड येथील नंदकुमार लोखंडे यांच्या दोन मोटारीची अज्ञात व्यक्ती कडुन चोरी

ताज्या बातम्या

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

आषाढी वारीसाठी जि.प.ची ‘सुट्टीतही ड्युटी’; सीईओंचे निर्देश

June 26, 2026

अहिल्यानगर येथे देवकर, देसर्डा, राजपूरे परिवारच्या वतीने झाला नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार

June 26, 2026

उत्स्फूर्त उत्साहात संपन्न झाली छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’!

June 26, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

June 26, 2026
शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

June 26, 2026
निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0940028

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697