Sunday, August 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरात शहरात १५ ऑगस्टपूर्वी धावणार ई-बस

तरुण भारतbyतरुण भारत
June 25, 2026
in solapur
0
सोलापुरात शहरात १५ ऑगस्टपूर्वी धावणार ई-बस
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत सोलापूरसाठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसांच्या
आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, १५ ऑगस्टपर्यंत किमान १५ ते ३० ई-बस नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याच्या सूचना महापौर विनायक  कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
         क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत पीएम ई-बस सेवा योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तळवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, नगरसेवक मनीष केत, जेबीएम कंपनीचे प्रतिनिधी कुलदीप गंगुरडे तसेच परिवहन विभागाचे अधिकारी नीलकंठ मठपती, अविनाश वाघमारे आणि अभिजित बिराजदार यावेळी उपस्थित होते.
       सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या १०० बसांमध्ये ९ मीटर लांबीच्या ७० आणि १२ मीटर लांबीच्या ३० बसांचा समावेश आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन या बसांना मंजुरी देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत टी.पी. क्रमांक २, न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे बांधकाम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले असून ‘बिहाइंड द मीटर’ (बीटीएम) वीज पायाभूत सुविधांची ९५ टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. उर्वरित कामे जुलैअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
         लोकप्रतिनिधींनी शहरासह ग्रामीण भागात अधिक बससेवा उपलब्ध करून देणे, बसथांब्यांवर वेळापत्रक प्रदर्शित करणे, विद्यार्थी व महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करणे, तीर्थक्षेत्रांसाठी नवीन मार्ग विकसित करणे आणि ऑनलाइन तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मांडल्या.पीएम ई-बस सेवा योजनेमुळे सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून प्रदूषणमुक्त, आधुनिक आणि नागरिकाभिमुख वाहतुकीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट
कार्यान्वित करण्यात येणार
वाहनतळासाठी आवश्यक असलेली ३३ केव्ही वीजवाहिनी, ५००० केव्हीए क्षमतेची वीज यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत आणि वॉशिंग एरिया या सुविधांच्या उभारणीचीही माहिती देण्यात आली. उपकेंद्र व केबल टाकण्याची कामे पूर्ण झाली असून जेबीएम कंपनीसोबत करार झाल्यानंतर चार्जिंग पॉइंट कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
 शासन नियुक्त जेबीएम कंपनी सर्व संचालन करणार
बैठकीत ई-बस संचालनासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या जेबीएम प्रा. लि., नवी दिल्ली या कंपनीसोबतच्या करारातील अटी-शर्तींवर चर्चा करण्यात आली. या करारानुसार बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, चालकांची नियुक्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि इतर खर्च कंपनीमार्फत करण्यात येणार आहेत.
सर्व कामे निर्धारित मुदतीत
पूर्ण करावीत : महापौर कोंड्याल
महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करून सोलापूरकरांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच स्वातंत्र्यदिनापर्यंत काही बस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतील यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Post Views: 73
Previous Post

आता महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणार मोफत…….. #viral #marathinews #news

Next Post

आम्ही एक कप चहासाठी सभेला येतो का?”; आषाढी वारीच्या सभेत सदस्य अण्णासाहेब ढाणे यांचा प्रशासनावर घणाघात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आम्ही एक कप चहासाठी सभेला येतो का?”; आषाढी वारीच्या सभेत सदस्य अण्णासाहेब ढाणे यांचा प्रशासनावर घणाघात

आम्ही एक कप चहासाठी सभेला येतो का?”; आषाढी वारीच्या सभेत सदस्य अण्णासाहेब ढाणे यांचा प्रशासनावर घणाघात

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला #news #solapurnews

August 16, 2026

शहराबाहेरून दोन रेल्वे लाईन मंजूर #viral #news #solapurnews

August 16, 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केले ध्वजारोहण #news

August 16, 2026

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ई बसेस उदघाटन

August 16, 2026

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शनही झाले तिरंग्या वेशभूषेत #news #viral #marathinews

August 16, 2026

बापरे नाशिक मध्ये नोटांचा छोटा कारखाना #viral #news #marathinews #latestnews

August 16, 2026

असा साजरा झाला ध्वजारोहण सोहळा #news#nationalnews

August 16, 2026

वंदे मातरम सोडून चर्चा करत उभ्या राहिल्या सोनिया गांधी #news #marathinews

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1073003

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!