सोलापूर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भागवतजी सरवदे साहेब, सचिव प्रविण निकाळजे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री. बबनराव साबळे साहेब, डॉ. आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती संतोषी साबळे मॅडम, रात्र प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सतीश शिंदे सर, वैदयकीय महाविदयालय सोलापूर प्राध्यापिका डॉ. सरोज बोलदे मॅडम हे मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
या प्रसंगी सामुहिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
मुख्याध्यापिका श्रीमती संतोषी साबळे मॅडम यांनी केले, विदयार्थ्यांची समायोचित भाषणे झाली, शिक्षक प्रतिनिधी श्री. सुशिल जानराव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच वैदयाकीय महाविदयालयात सोलापूर प्राध्यापिका डॉ. सरोज बोलदे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवतजी सरवदे साहेब यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती सांगून त्यांचे विचार जीवनात अंगीकारावेत असे सांगितले. या प्रसंगी डॉ. सरोज बोलदे मॅडम यांच्या कडून विदयार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विश्वनाथ कुलकर्णी सर यांनी केले व आभार श्रीमती चित्रा धारशिवकर मॅडम यांनी मानले.

























