श्रीपूर – येथिल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्ञानेश्वर सुरवसे , शैलेश साबळे , व दादासाहेब सावंत यांच्या संकल्पनेतून भारत रत्न डॉ . बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजीक उपक्रम राबवत तीन हजार शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप श्रीपूर येथिल पत्रकार बी . टी . शिवशरण, आटपाडी कॉलेजचे प्राचार्य तसेच श्रीपूर भिमरत्न तालीम संघाचे संस्थापक उत्तम मोटे , प्रवीण गाडे , संजय खरे , ब्रिमा सागरचे कामगार प्रतिनिधी दावल शिवशरण, संजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीपूर मध्ये २३ एप्रील रोजी डॉ . आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध संघटनांच्या वतीने श्रीपूरच्या मुख्य रस्त्यावरून आकर्षक देखावे , नयनमनोहर विद्युत रोषणाई , लेझर शो या माध्यमातून अभूतपूर्व मिरवणूक काढण्यात आली होती .
जयंती निमित्त परिसरातून हजारो अनुयायी या मिरवणूकीत सामील होत असतात . चार तास चालणाऱ्या या मिरवणुकी मध्ये सामील झालेल्यांना या माध्यमातून पिण्यासाठी पाणी मिळल्याने चांगली सोय झाली .























