
मोहोळ – सोनार समाजात आजही पदवीधर शिक्षणाची वानवा आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, कठोर परिश्रम व समर्पण या जोरावर कु. गायत्री दीक्षित हीने एम. बी. बी. एस. शिक्षण पूर्ण करून डॉक्टर पदवी मिळविली.त्यामुळे गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गार श्री संत नरहरी बहुउद्देशीय संस्था मंडळाचे अध्यक्ष महेशकाका पंडित यांनी काढले. ते सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. नागनाथ विद्यालयाचे आदर्श कलाशिक्षक श्री. दिलीप दीक्षित यांची गायत्री ही सुकन्या आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. पदनकुमार दीक्षित ( निवृत्त नायब तहसिलदार ) यांचे शुभहस्ते गायत्री व तिच्या आई वडिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी महेश काका पंडित बोलत होते .
डॉ विठठलराव विखे पाटील मेडीकल कॉलेज, अहिल्यानगर येथे गायत्रीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले. उपस्थितांनी डॉ.गायत्रीचे कौतुक करून तिला पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी निवृत्ती महामुनी, विजयकुमार दीक्षित,अनिरुद्ध क्षीरसागर, प्रमोद दीक्षित, प्रा. अशोक वेदपाठक, राजेश दीक्षित,सचिन महामुनी, प्राचार्य पी. एस. शिंदे, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. संभाजी चव्हाण,श्री.माने, उबाळे सर, बोराडे सर मित्र परिवार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.