बार्शी – श्रीमंत शिवसूर्य बहुद्देशीय प्रतिष्ठान बार्शी, संचलित शिवसेवा वाचन संस्कृती आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन दि. १४ एप्रिल रोजी श्रीकृष्ण मंदीर उपळाई रोड येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सई वुमन्स हाॕस्पीटलचे डॉ. कुमार जगताप, प्रमुख पाहुणे ऍड. विवेक गजशिव, सामाजिक कार्यकर्ते सुमित खुरंगळे, पत्रकार चंद्रकांत करडे, गणेश भोळे, उत्तम पोतदार, शिवराज्य सेनेचे हर्षवर्धन पाटील, नगरसेवक आकाश राऊत, रणजीत पाटील, सूर्या मस्के, जाणीव फाउंडेशनचे उपाध्यक्ष वसंत हवालदार, ग्रंथपाल विनोद गायकवाड, श्री स्वामी समर्थ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अतुल पाडे यांनी शिवसेवा वाचन संस्कृतीचे कार्य व वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगितले. सुरुवातीला संविधान वाचन समीक्षा जमदाडे हिने केले.
सर्वच विद्यार्थ्यांना महापुरुषांचे पुस्तके भेट देण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवराज्य सेनेचे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मनोगतमध्ये संविधानाचे महत्त्व विशद केले यानंतर ऍड. विवेक गजशिव यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठलाही जातीभेद व धर्मभेद न करता समतेचा संदेश कसा दिला हे सांगितले.
तसेच डॉ. कुमार जगताप यांनी महापुरुषांचे विचार समजण्यासाठी सखोल वाचन केले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. उपस्थित असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उदयकुमार पोतदार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रितम मोरे, गणेश पवार, राज सदावर्त, राज जगताप, वेदांग पाडे यांनी परिश्रम घेतले.



















