Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर झेडपीचे कुशल जैन नवे सीईओ; कुलदीप जंगम यांची यांची पिंपरी-चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
सोलापूर झेडपीचे कुशल जैन नवे सीईओ; कुलदीप जंगम यांची यांची पिंपरी-चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी-चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी युवा आयएएस अधिकारी कुशल जैन यांची नियुक्ती होत असून, जिल्हा परिषदेच्या प्रशासनात आता नव्या नेतृत्वाची सुरुवात होत आहे.

         कुलदीप जंगम यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत आपल्या कार्यकाळात प्रशासनाला गती देत विविध विकासकामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषतः आपत्कालीन परिस्थितींमध्ये त्यांनी दाखवलेली तत्परता आणि समन्वय कौशल्य उल्लेखनीय ठरले. पूरपरिस्थितीच्या काळात त्यांनी केलेले नियोजन, मदतकार्याची अंमलबजावणी आणि विविध यंत्रणांमध्ये साधलेला समन्वय यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांना गती मिळाली आणि प्रशासन अधिक परिणामकारक झाले.

जंगम यांच्या कार्याची दखल राज्य शासनाने घेत त्यांना ‘सेवा कर्म पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या बदलीमुळे जिल्हा परिषदेतील एक सक्षम आणि अनुभवी अधिकारी पुढील जबाबदारीकडे जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड येथे अप्पर आयुक्त म्हणून ते नवे आव्हान स्वीकारणार असून, त्यांच्या अनुभवाचा तेथेही उपयोग होईल, अशी अपेक्षा आहे.

        दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची धुरा आता युवा आयएएस अधिकारी कुशल जैन यांच्या हाती येणार आहे. २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ४० वा क्रमांक मिळवत त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. शैक्षणिकदृष्ट्या ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेले अधिकारी असून, बंगळुरू येथील आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी इन्फॉर्मेशन सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्ट इंडियामध्ये सुमारे दीड वर्ष कामाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याची त्यांची क्षमता मानली जाते. २०२२ बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या जैन यांना सुरुवातीला आंध्र प्रदेश कॅडर मिळाले होते; मात्र २०२३ मध्ये त्यांनी महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी वृष्टी जैन यांच्याशी विवाह केल्यानंतर आंतर-कॅडर बदलीद्वारे महाराष्ट्र कॅडर स्वीकारले.

    सध्या ते गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून कार्यरत असून, यापूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. दुर्गम आणि संवेदनशील भागात काम करण्याचा त्यांना अनुभव असल्याने सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्यातील प्रशासन हाताळताना त्याचा उपयोग होण्याची शक्यता आहे. कुलदीप जंगम यांच्या अनुभवी नेतृत्वानंतर आता कुशल जैन यांच्या रूपाने युवा, तांत्रिक दृष्टिकोन असलेले नेतृत्व सोलापूर जिल्हा परिषदेला लाभत आहे. त्यामुळे आगामी काळात विकासकामांना वेग मिळून प्रशासनात नव्या कार्यशैलीचा अवलंब होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post Views: 15
Previous Post

पाणी निचरा, कचरा व बायो एनर्जी संदर्भात तातडीने उपाययोजना करा 

Next Post

डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन साजरा

डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त वाचन दिन साजरा

ताज्या बातम्या

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

April 16, 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

April 16, 2026
ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

April 16, 2026
आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

आरोही भोसले चौथीच्या विद्यार्थीनीची बचत; शोळेला दिले आठ घड्याळे

April 16, 2026
जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जनमंगल पतसंस्थेतर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 16, 2026
शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ भारतरत्न डॉ. आंबेडकरांचा विचारच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग

April 16, 2026
जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

जनमंगल फाउंडेशनतर्फे पाणपोईचे उद्घाटन

April 16, 2026
निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

निमा स्थापना दिनानिमित्त शासकीय रुग्णालय येथे औषधी वनस्पती लागवड

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0812298

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697