बार्शी – येथील बार्शी एज्युकेशन सोसायटी संचलित सुलाखे इंग्लिश मिडीयममध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच संपूर्ण समता सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा इ.१ ली ते ९ वीपर्यंतच्या क्लासमध्ये घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामधून न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचे महत्व विषद केले.
जयंती दिनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुलाखे इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक तुषार महाजन सर उपस्थित होते. तसेच प्रि प्रायमरी सेक्शनच्या मुख्याध्यापिका सौ. बेताळे मॅडम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी कांबळे सर, महाजन सर व सौ. बेताळे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनीमधून सह्याद्री कानगुडे, रितिका नन्ना व प्रियदर्शनी वाघमारे इ.नी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमोल कुलकर्णी यांनी केले.



























