पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महीने झाले तरीही म्हणावा तसा पाऊस पडलाच नाही .यामुळे सध्या तरी पिलीव परिसरावर दुष्काळाचे संकट उभे राहीले आहे .आता अंतीम टप्प्यात किती पाऊस पडणार कारण या भागातील ओढे, नाले वाहीलेच नाहीत.तर अद्यापपर्यंत तळी, बंधारे ,तलाव कोरडेच आहेत. ते कधी भरणार. या भागातील सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी या भागात शेतीच्या पाण्याबरोबरच, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.तर अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार पडलेल्या पावसावर बाजरी, मका ,कडवळ अशी पिके पेरली होती. पण पाऊसच न पडल्यामुळे सध्या पाण्यावाचून ही पिके धोक्यात आली आहेत. ही पिके राहतात की जळुन जातात अशी गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.पाऊस न पडल्यामुळे विहीरीना ही पाणीच नाही.विहीरींनी ऐन पावसाळ्यात अक्षरश तळच गाठला आहे.सध्या या भागातील खरीप हंगाम वाया जातो की काय एवढी भिषण परिस्थितीत निर्माण झाली आहे .वर्षा वर्षे या भागातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सतावत आहे .या कायमस्वरुपी दुष्काळी पट्ट्यातील गावांना निरा _ देवधरचे पाणी कधी मिळते . नाही या भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळ पाचवीलाच पुजला आहे.सध्याचे भाजपा _महायुतीच्या सरकारकडुन या भागाला पाणी मिळेल अशी अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांना आहे.पण सध्या पाऊस नसल्यामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.यामुळे सध्या पिलीव परिसरातील दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















