Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दोन कोटीचे अमली पदार्थ जप्त – दोघांना अटक

तरुण भारतbyतरुण भारत
May 13, 2026
in crime
0
दोन कोटीचे अमली पदार्थ जप्त – दोघांना अटक
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : खबरी कडून मिळालेल्या माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मोदी मुस्लिम कब्रस्तान समोरील व्हीआयपी रोडवर एका कारमधून २ कोटी रुपयाचा  ९५० ग्राम वजनाचा अंमली पदार्थाचा साठा ( मेफेड्रोन )जप्त केला आहे. सदर कारवाईत दोन आरोपींना अटक करून एका महिलेसह चार जणांविरुद् सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस आयुक्त गोहर हसन यांनी आज मंगळवार रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

        ही कारवाई आज मंगळवारी सकाळी सहा वाजता झाली असून रिजवान शब्बीर खान (वय २८, रा. नई जिंदगी), साहिल सिकंदर पिरजादे (वय २५, रा. मंत्री चंडक नगर) या दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.दोन्ही आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर इतर आरोपींची नावे अफजल मुर्शद (रा. मुस्लीम कब्रस्तान जवळ, सोलापूर ) आणि साहील सिकंदर पिरजादे याची पत्नी कायनात साहील पिरजादे ऊर्फ कायनात साहील खान ( वय ३० वर्षे, मुळ पत्ता- रुम नं.- ३८४, जनता सेवक सोसायटी, एल.जे. रोड माहीम (पश्चिम), मुंबई, सध्या रा. फ्लॅट नं.  ४०६ अल्तमश अपार्टमेंट मंत्रीचंडक नगर, सोलापूर ) अशी असून आरोपी अफजल मुर्षद हा फरार झाला आहे.

         मंगळवारी १२ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास, व्हीआयपी  रोडवरील संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका संशयास्पद कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती पोलीस शिपाई भारत पाटील यांना मिळाली.होती .आरोपींवर पाळत ठेवायची होती; पण कशी? मग पोलिसांनी शक्कल लढविली. मोदी कबरस्तान ते संगमेश्वर कॉलेज या मार्गावर मॉर्निंग वॉक करत असल्याचे भासविले. त्यांना अपेक्षित असलेली कार थांबलेली दिसली अन् त्या वॉकिंग करणाऱ्या सपोनि दत्तात्रय काळे व त्यांच्या पथकाने कारला घेराव घातला. कारची तपासणी केली असता चालकाच्या सीट शेजारील ड्रॉव्हरमध्ये एका प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाचे स्फटीक सापडले. तपासणी ते अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले .पोलिसांनी या कारवाईत १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम मेफेड्रोन व १० लाख रुपये किमतीची मोटार कार जप्त केली आहे.

       सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त गोहर हसन, डॉ. अश्विनी पाटील आणि सहा. पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि दत्तात्रय काळे, अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे आणि संजय साळुंखे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Post Views: 31
Previous Post

मोटर कारची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक ; दोन तरुण मित्र जागीच ठार 

Next Post

स्मार्ट मीटरविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
स्मार्ट मीटरविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन

स्मार्ट मीटरविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन

ताज्या बातम्या

नाईट लँडिंगचे कारण नको विमानसेवा सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी #viral #news #solapurnews

June 27, 2026

म्हणून उडत नाहीये सोलापूरातून विमान….. #viral #news #solapurnews

June 27, 2026

केतनचे परिवार भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

June 27, 2026

दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा खर्च रु १४५ ११ कोटी #viral #news #solapurnews

June 27, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आत्मचिंतनाची गरज #news #marathinews

June 27, 2026

टी ई टी परीक्षेचा पेपर फुटला #viral #news #breakingnews

June 27, 2026

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींनी जे घडलं ते थेट सांगितले….. #viral #marathinews #news

June 27, 2026

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0942673

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697