Wednesday, July 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रस्त्या उंचीकरणामुळे विद्युत तारा तुटण्याचे सत्र सुरू!

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देगलूर – तालुक्यातील कुशावाडी येथे रस्त्याच्या उंचीकरणाने नागरिकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले असून मागील काही महिन्यांपासून विद्युत तारा वारंवार तुटण्याचे सत्र सुरू आहे. होट्टल फाटा ते होट्टल पुढे करडखेडकडे जाणारा रस्ता नव्याने बांधण्यात आल्याने रस्त्याची उंची वाढली; मात्र या रस्त्यावरून जाणाऱ्या महावितरणच्या विद्युत ताऱ्यांची उंची मात्र कमी झाली आहे. परिणामी उंच वाहनांचा स्पर्श होऊन या तारा वारंवार तुटत असल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे.

कुशावाडी गावात रस्त्याच्या एका बाजूस असलेल्या डीपीपासून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस गावाकडे जाणाऱ्या विद्युत तारा थेट रस्त्यावरून जात आहेत. यामुळे उंची असलेली वाहने या तारांना स्पर्श करून त्या तुटून थेट रस्त्यावर कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असून एखाद्या क्षणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके आहेत. तुटलेल्या विद्युत तारांमुळे या स्मारकांना नुकसान पोहोचण्यासह नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

बातमीपुरते नव्हे, सामाजिक कर्तव्यही निभावले

दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास या मार्गाने जाणाऱ्या एका वाहनामुळे विद्युत तार तुटून ती थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाभोवती गुंडाळली गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धोका किती गंभीर आहे हे या घटनेने अधोरेखित केले. या घटनेची माहिती मिळताच दै. तरुण भारतचे प्रतिनिधी मिलिंद वाघमारे यांनी सामाजिक बांधिलकी जपत महावितरण देगलूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. चाटे यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उंचीचे खांब उभारणे अत्यावश्यक असून विद्युत तारांच्या स्पार्कमुळे स्मारकांसह नागरिकांना धोका होऊ शकतो, हा परिसर वर्दळीचा व बसस्थानकाचा असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. यामुळे तरुण भारत केवळ बातमीपुरते न थांबता सामाजिक जबाबदारीही पार पाडते, अशी भावना नागरिकांसह महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. चाटे यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले.

बसस्थानक, हॉटेल्स, दुकाने… धोका अधिक तीव्र

हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून येथे कुशावाडी गावाचे बसस्थानक आहे. शिवाय दोन हॉटेल्स, कृषी सेवा केंद्र, इलेक्ट्रिक साहित्याचे दुकान असल्याने दिवसभर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी नेहमीच येथे थांबलेले असतात. अशा ठिकाणी वारंवार विद्युत तारा तुटणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करण्यासारखे आहे.

उंच खांबाशिवाय दुसरा पर्याय नाही !

नव्याने झालेल्या रस्त्यामुळे विद्युत तारांची उंची कमी झाली असून त्यामुळेच हे प्रकार वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी योग्य उंचीचे नवीन विद्युत खांब उभारावेत किंवा तात्पुरता उपाय म्हणून सध्याच्या खांबांची उंची वाढवावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

याआधीही अनेकदा तार तुटल्या

ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही अनेक वेळा या मार्गावर विद्युत तारा तुटल्या आहेत. विशेषतः रात्री-बेरात्री एखाद्या वाहनामुळे तार तुटल्यास प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत आहे.

तात्पुरती मलमपट्टी नको, कायमस्वरूपी उपचार हवेत

घटना घडताच सुजाण नागरिकांनी महावितरण विभागाला माहिती दिली. त्यानंतर विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन तुटलेल्या तारांची दुरुस्ती केली. मात्र ही कारवाई केवळ तात्पुरती मलमपट्टी ठरत असून कायमस्वरूपी उपाययोजना केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी योग्य उंचीचे विद्युत खांब बसवून या धोकादायक परिस्थितीचे कायमस्वरूपी ‘ऑपरेशन’ करणे हाच एकमेव मार्ग असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Post Views: 141
Previous Post

तहसील कार्यालय व परिसरात अनधिकृत दलाल/एजंट यांना सक्त मनाई.#viral #public #marathinews #marathinews

Next Post

मरवाळीतांडा आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मरवाळीतांडा आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

ताज्या बातम्या

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

१ ते ९ जुलैदरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम

June 30, 2026

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950477

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697