सोलापूर – भर वेगातील आयशर टेम्पो उलटला गेल्याने वाहनातील क्लीनर तरुण जागीच ठार झाल्याची घटना मोहोळ कामती रस्त्यावर ठोक बाभळगाव पाटीजवळ आज सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली .
प्रदीप परमेश्वर पवार ( वय 29 वर्ष , रा . तांबोळे , ता मोहोळ ) असे त्या मयत आयशर क्लीनर चे नाव आहे . तो आज सोमवारी दुपारी आयशर टेम्पो मधून मोहोळ कडून कामति कडे निघाला असताना वाटेत ठोक बाबळगाव पाटीजवळ आयशर वाहन क्लीनर साईडला पलटी झाले . यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला एका खाजगी ॲम्बुलन्स मधून येथील शासकीय रुग्णालयात दुपारी चार वाजता नबीलाल तांबोळी यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
Post Views: 13