सोलापूर – भारती विद्यापीठ संलग्न डॉ. पवार प्राथमिक शाळा, सोलापूर येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी अभियंता सागर राजेंद्र पुकाळे यांची पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शैक्षणिक नियोजन तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
अभियंता सागर पुकाळे यांच्या अनुभवाचा व सामाजिक कार्यातील योगदानाचा शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी समितीचे अध्यक्ष मा. डॉ. सगरे महादेव शिवलिंग, उपाध्यक्ष अभियंता सागर राजेंद्र पुकाळे, मुख्याध्यापिका, शिक्षक प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प अभियंता सागर पुकाळे यांनी व्यक्त केला.
Post Views: 5